स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

मुख्यपृष्ठावर परत
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (संशोधन आणि विकास)

उ. महाबीज संशोधन व विकास विभागाची स्थापना 199२ साली झाली.

उ. होय संशोधन व विकास विभाग डी.एस. आय.आर. मान्यताप्राप्त आहे.
उ. महाबीजचे संशोधनात्मक कार्य संशोधन व विकास विभाग शिवनी व पैलापाडा प्रक्षेत्र येथे चालते.
उ. महाबीज संशोधन व विकास विभाग शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे हे रास्त दरात उपलब्ध करून देण्यात तसेच खाजगी बियाणे क्षेत्राची मक्तेदारी नियंत्रणात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
उ. महाबीज संशोधन व विकास विभाग प्रमुख पिकांच्या सुधारित तसेच संकरित वाण निर्मितीचे तसेच गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मितीचे कार्य करते. यामध्ये कीड व रोगास सहनशील/ प्रतिकारक्षम वाणांची निर्मिती तसेच अजैविक ताणास सहनशील वाण निर्मितीचे कार्य करते.
उ. हवामान बदलास अनुरूप अधिक उत्पादनक्षम सुधारित वाणाची निर्मिती करणे तसेच जैविक ताणास सहनशील वाण निर्मिती करणे. मर्यादित पाणी आणि अन्नद्रव्यांचा सुयोग्य वापर यावर कार्य करणे.
उ. ज्वारी, बाजरी, मका, कपाशी, तुर, सूर्यफूल, मूग, उडीद व भाजीपाला पिके.
उ. महाबीजचे ज्वारी पिकामध्ये तीन संकरित वाण आहेत महाबीज-७०४, महाबीज-७ आणि भाग्यलक्ष्मी-२९६. हे तिन्ही संकरित वाण खरीप हंगामासाठी योग्य आहेत.
उ. होय, बाजरी पिकामध्ये महाबीज १००५ हे प्रसारित व अधिसूचित वाण उपलब्ध आहे.
उ. मका पिकामध्ये उदय हे खरीप हंगामासाठी योग्य असे संकरित वाण उपलब्ध आहे. हे वाण प्रसारित आणि अधिसूचित आहे.

उ. होय, महाबीज चे बीटी कपाशीचे संकरित वाण पीकेव्ही हायब्रीड-२ बीजी-२ आणि एन.एच.एच.-४४ बीजी-२ हे कोरडवाहू क्षेत्रासाठी महाराष्ट्रात लागवडी योग्य दोन संकरित वाण आहेत.

उ. महाबीजचे सध्या एम.पी.व्ही. १०६ ही वाण प्रसारित आणि अधिसूचित झालेले आहे.

उ. महाबीजचे संशोधित केलेले भास्कर हे सूर्यफूल संकरित वाण उपलब्ध आहे.

उ. मुग पीकाचे उत्कर्षा व उन्नती हे दोन संशोधित वाण उपलब्ध आहेत.

उ. उडीद पिकामध्ये विजय आणि एम.यु. ४४ हे दोन वाण उपलब्ध आहेत.

उ. महाबीज भेंडी, वांगे, चवळी, गवार, शिरी दोडका, चोपडा दोडका, दुधी भोपळा, टमाटे आणि मिरची या भाजीपाला पिकांवर संशोधन करते.

उ. भाजीपाला पिकांमध्ये महाबीजचे पुढील वाण उपलब्ध आहेत : भेंडी –तनवी, संकरित वांगे- जयंत आणि यशवंत, शिरी दोडका – ऐश्वर्या, दुधी भोपळा –ईश्वर, चोपडा दोडका –दिव्यांका, चवळी- पार्वती, गवार- गौरी.

उ. महाबीज संशोधन व विकास विभागाचे संशोधित वाण शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेते आणि वितरक यांच्याकडे उपलब्ध होते.