महाबीज द्रवरूप जैविक खते व जैविक बुरशीनाशकपरिचयमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा द्वारे मुख्यत: राज्यातील शेतकरी बांधवांना त्यांचे मागणीनुसार विविध पिक/वाणांचे गुणवत्तापूर्ण बियाणे वाजवी दरामध्ये वेळेत उपलब्ध करून देण्यात येते. राज्यातील शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चामध्ये बचत करून त्यांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण बियाण्यासोबतच महामंडळ सन 2009 पासून जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा तसेच सन 2017 पासून द्रवरूप जैविक खते रायझोबीयम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी आणि केएमबी यांची उपलब्धता राज्यातील शेतकरी बांधवांना करून देत आहे. महाबीज उत्पादित जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचे वापरामुळे रोग पसरविणाऱ्या हानीकारक बुरशींची वाढ न होता नायनाट होतो. तसेच द्रवरुप जैविक खतांच्या वापरामुळे नत्र स्थिरीकरण तसेच स्फुरद/पालाश विद्राव्याच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ होऊन त्याची परिणिती पिकांच्या उत्पादन वाढीत होते. या गुणवत्तापूर्ण जैविक उत्पादनांचा उपयोग शेतकरी बांधव प्रामुख्याने बीज प्रकियेसाठी करत असून त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन उत्प्ान्नात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांकडून महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व द्रवरुप जैविक खते यांचे मागणीमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. महाबीजव्दारे उत्पादित उपरोक्त्ा उत्पादने पूर्णपणे जैविक असून पर्यावरणपुरक आहेत. याव्यतिरिक्त, महामंडळाव्दारे द्रवरुप जैविक खतांचा संघ तसेच इतर महत्वाच्या जैविक उत्पादनांबाबत संशोधन सुरु असून ही उत्पादने लवकरच शेतकरी बांधवांच्या सेवेत उपलब्ध होतील. सद्यस्थितीत महामंडळाव्दारे उपरोक्त जैविक उत्पादनांची निर्मिती व पुरवठा खालील नमुद केलेल्या प्रयोगशाळांमधून होत आहे.
महाबीज नत्र स्थिर करणारे जिवाणू (रायझोबियम, अझोटोबॅक्टर ), स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी), पालाश उपलब्ध करणारे जिवाणू (केएमबी), हे सर्व जैविक खते द्रव स्वरूपात तयार करतात. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() खान आसिफ अहमद (संगणक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल
|
|
![]() ![]() |