बियाणे प्रक्रिया व संचयपरिचयबिजोत्पादकाच्या बियाण्यावर प्रक्रिया करण्याकरीता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्हयामध्ये २३ बिज प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये २२ तृणधान्य बिज प्रक्रिया केंद्र त्याची खरीप हंगामामध्ये ६,६०,००० क्विंटल तसेच रब्बी हंगामामध्ये ४,९५,००० क्विंटल बियाणे प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. तसेच भाजीपाला बियाणे प्रक्रिया करीता स्वतंत्र प्रक्रिया केंद्र असुन त्याची वार्षीक बियाणे प्रक्रिया क्षमता १०,५०० क्विंटल ऐवढी आहे. शेतकऱ्यांना विहीत कालावधीमध्ये बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अतीरीक्त बियाणे प्रक्रिया करण्याकरीता कस्टम बेसीसवर प्रक्रिया करून घेण्यात येत असते. नविन तंत्रज्ञानावर आधारीत ८ टीपीएच क्षमतेची प्रक्रिया संच बिज प्रक्रिया केंद्र, शिवणी (अकोला), चिखली (जि. बुलढाणा), वाशिम, श्रीरामपूर (जि. अहमदनगर), एरंडोल (जि. जळगाव), आणि परभणी येथे उभारणी करण्यात आलेली आहेत तसेच ६ टीपीएच क्षमतेची प्रक्रिया संच बीज प्रक्रिया केंद्र हिंगोली आणि ढोकी (जि. उस्मानाबाद) येथे बसवीण्यात आलेले आहे तसेच ४ टीपीएच क्षमतेची प्रक्रिया संच बीज प्रक्रिया केंद्र जालना, आष्टा (जि. सांगली), सेलू (जि. वर्धा), गडेगाव (जि. भंडारा), मुल (जि. चंद्रपूर), लातूर, यवतमाळ, बुटीबोरी (जि. नागपूर), मलकापूर (जि. बुलढाणा), तपोवन (जि. अमरावती), सटाणा (जि. नाशिक) येथे बसवीण्यात आलेले आहेत २ टीपीएच क्षमतेची प्रक्रिया संच बीज प्रक्रिया केंद्र खामगाव (जि. बुलढाणा), धनेगाव (जि. नांदेड), आणि दोंडाईचा (जि. धुळे) आणि १ टीपीएच क्षमतेचे प्रक्रिया संच भाजीपाला बियाणे प्रक्रिया केंद्र एमआयडीसी अकोला येथे उभारणी करण्यात आलेले आहे. बियाणे प्रक्रिया करीता आवश्यक असणारी अत्याधुनीक प्रक्रिया संचाची उभारणी वरील बिज प्रक्रिया केंद्रावर करण्यात आली असुन त्यामध्ये वजन, आकार, बियाण्याच्या दर्जेनुसार या निकषानुसार बियाण्याची प्रतवारी करण्यात येते सदर प्रक्रिया संचामध्ये बियाणेची हाताळणी सुलभ होण्याकरीता हायड्रोलिक लोडर, झेड टाईप एलीवेटर, ग्रेडींग मशीन, ग्रॅव्हीटी सेपरेटर, सेमी ऍटोमीक पॅकींग मशिन, सीड ट्रीटर, पाउच तथा लेबल छपाई करीता व्हिडीओजेट प्रिंटींग मशिन तसेच टॅगींग अँन्ड सीलाई मशीन उपयोगात आणण्यात येत आहे बिजोत्पादकाचे कच्चे बियाणे वजन करण्याकरीता ३०/५० मे. टण क्षमतेचे इलेक्टॉनीक वेब्रीज बसवीण्यात आलेले आहेत तसेच अंतर्गत बियाणे वाहतुकीकरीता फोर्कलिफ्ट ट्रक वापर करण्यात येत आहे. बिज प्रक्रिया केंद्रावरील कामे सुलभ, अचुक तथा जलदगतीने होण्याकरीता बिज प्रक्रिया केंद्राचे संगणकीकरण करण्यात आलेले असुन त्यामुळे बिजोत्पादकाचे बियाणे स्वीकृत करण्यापासुन, प्रक्रिया, पॅकींग, निकाल, बिजोत्पादकाचे शोधन तसेच बिजोत्पादन कार्यक्रम तथा विपणनाकरीता बियाणे पाठवीणे ई. नोंदी संगणकामध्ये घेण्यात येत आहे त्यामुळे बिजोत्पादकांना तसेच विक्रेत्यांना त्यांच्या नोंदीची माहिती अदयावत उपलब्ध होत आहे तसेच बिजोत्पादकांना प्रक्रिये करीता हजर राहाणेकरीता, निम्नस्तर तथा अपात्र बियाणे उचल करण्याकरीता एसएमएस व्दारे कळवीण्यात येत असते. बिज प्रक्रिया केंद्रावर बियाणे साठवणुक करण्याकरीता अत्याधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रयुक्त गोदामाची उभारणी करण्यात आलेली आहे. सदर गोदामाची साठवणुक क्षमता ७,२१,००० क्विंटर येवढी आहे. गोदामामध्ये साठवणुक केलेले बियाणे हवेशीर, कोरडे राहण्याकरीता टरबोव्हेंटीलेटर, उबदार खीडक्या तसेच गोदामातील तापमान कमी करण्याच्या उद्देशाने पीपीजीआय शीटसह, उष्णतारोधक शीट चे छप्पर बसवीण्यात आलेले आहे. बियाणे साठवणुकीकरीता पॅलेट्सचा उपयोग करण्यात येत आहे.
| ||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|