स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

विपणन : “उच्चतम दर्जाचे बियाणे रास्त दरात उपलब्ध करणे”

परिचय : आमचा उद्देश

आम्ही मानतो की उच्चतम दर्जाचे बियाणे रास्त दरात मिळण्यावर सर्व स्तरातील शेतकरी वर्गाचा हक्क आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी माफक दर व प्रत्येक टप्प्यावर उच्च गुणवत्तेचे निकष पाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व प्रमुख पिकामध्ये आमचे बियाणे दर हे चार दशकांपासुन बियाणे उदयोगामध्ये दिशादर्शक ठरत आहे. अशा प्रकारे महाबीज सर्वसाधारण बियाणे किंमतीमध्ये किफायतशीरपणा राखण्याची खात्री करते व यासाठीच महाबीज बियाणे उदयोगात ओळखले जाते.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित हे आपले बियाणे महाबीज या प्रचलित नावाने विपणन करीत आहे. जे गेल्या ४५ पेक्षा अधिक वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय व खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची कंपनी म्हणून विश्वासपात्र ठरलेले आहे.

विपणन विभागाव्दारे बियाणे वितरण व विपणन कार्यात निपूण अशा जवळपास १००० अधिकृत विक्रेत्यांचे जाळे राज्यामध्ये सर्वदूर पसरविले असून, त्याव्दारे राज्यभर बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. विपणन विभाग शेतक-यांना अनुकुल असे विपणन धोरण अवलंबित असून रास्त दरात व निर्धारित वेळेमध्ये बियाणे उपलब्ध करून देते. पिक प्रात्यक्षिक, शेती कार्यशाळा, शेती दिन इ. व्दारे शेतक-यांना प्रशिक्षीत करण्याकरीता विस्तार कार्याचे सुध्दा मोठया प्रमाणावर आयोजन करण्यात येते. विक्रेत्यांना सुध्दा वेळेत बियाणे पुरवठा, “विक्रित्तोर सेवा” व विस्तार इत्यादींचे पाठबळ देऊन, बियाणे विक्रीवर माफक सूट व सवलती देण्यात येतात. महामंडळाव्दारे राज्य व केंद्र सरकारच्या बियाणे पुरवठा विषयक योजनांमध्ये प्राधान्याने बियाणे पुरवठा करुन शासकीय योजनांमध्ये सक्रीय सहभाग घेण्यात येतो. महाराष्ट्राबाहेर विपणनाचे कार्य देशातील मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा या इतर राज्यात सुध्दा हाताळण्यात येते. महामंडळाचा स्वतंत्र जैवतंत्रज्ञान व उती संवर्धन विभाग कार्यरत आहे. तसेच उती संवर्धित केळी, फुलझाडे, शोभिवंत झाडे, फळझाडे इत्यादी सुध्दा विक्रि महामंडळा मार्फत करण्यात येते. याशिवाय शाश्वत शेतीस चालना देण्यासाठी महामंडळाव्दारे उच्च प्रतीची जैविक खते व बुरशीनाशके यांचे उत्पादन व विक्री करण्यात येते.

महामंडळ, राज्य व केंद्रशासनाच्या विविध नविन संकल्पना, सवलती व योजनांचा स्विकार करुन उत्तम कसे सर्वोत्तम होईल, हयाचा नेहमीच पाठपुरावा करते व हेच महामंडळाच्या यशाचे गमक आहे.







*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*