स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

करडई

करडई पिकातील एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
पीकेव्ही पिंक डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१३ १० १३५ ते १४० झाडाची उंची ७० ते ८० सें. मी., फिक्कट पिवळी ते गुलाबी रंगाची फुले, ३० ते ३५ दाणे प्रती ओंबी, लहान पांढरे दाणे, ३३ टक्के तेल उतारा, मर रोगास प्रतिकारक. १२ ते १५
पीबीएनएस-१२ व. ना. म. कृ. वि., परभणी २००६ १० ११५ ते १३७ झाडाची उंची ९६ सें.मी., काटेरी गडद ‍हिरवी जाड पांने, पिवळी ते नारंगी लाल रंगाची फुले, २० ते २३ दाणे प्रती ओंबी, टपोरा पांढरा दाणा, २९ टक्के तेल उतारा, मावा किड व मर रोगास सहनशील. १० ते ११
पीबीएनएस-८६ व. ना. म. कृ. वि., परभणी २०१९ १० १३० ते १४०  झाडाची उंची ६७ सें. मी. (कोरडवाहु) व १०२ सें. मी. (बागायती), काटेरी गडद हिरवी पाने, २४ ते ३२ दाणे प्रती ओंबी, टपोरा पांढरा दाणा, २७ टक्के उतारा, मावा किड व मर, पानावरील ठिपके रोगास सहनशील. १६ ते १८
एसएसएफ-७०८ म. फु. कृ. ‍वि., राहुरी २०१० १० ११५ ते १२० झाडाची उंची ७२ सें.मी. मध्यम, काटेरी लहान पाने, निमपसरी वाढ, तळापासून फुटवे येणारी, ‍पिवळी ते लाल रंगाची फुले, मध्यम काटेरी ओंब्या, २२ ते २३ दाणे प्रती ओंबी, मध्यम आकाराची पांढरी दाणे, ३१ टक्के तेल उतारा, मावा, किडीस मध्यम प्रतिकारक. १५ ते २०
एसएसएफ-७३३ म. फु. कृ. ‍वि., राहुरी २०१३ १० १२० ते १२५ झाडाची उंची ७२ सें.मी. मध्यम, काटेरी लहान पाने, निमपसरी वाढ, तळापासून फुटवे येणारी, ‍पिवळी ते लाल रंगाची फुले, मध्यम काटेरी ओंब्या, २२ ते २३ दाणे प्रती ओंबी, मध्यम आकाराची पांढरी दाणे, ३१ टक्के तेल उतारा, मावा, किडीस मध्यम प्रतिकारक. १० ते १२


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*