स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

गहू

Wheat

गहू पिकातील एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
लोक-१ लोकभारती सनसोरा, गुजरात १९८१ १०० १०० ते १०५ लालसर टपोरे दाणे, भरघोस उत्पादन क्षमता असलेला लोकप्रिय वाण. ३७ ते ४०
एकेडब्ल्यु-४६२७ डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१२ १०० ९५ ते १०० झाडाची उंची ७८ सें.मी. टणक खोड, मोमदार नसलेली रुंद पाने, सरळ वाढ, २ ते ३ फुटवे, लोळण्यास मध्यम सहनशील, न झडणारी ओंबी, अंडाकार अंबर रंगाचे मध्यम कठिण दाणे, तांबेरा व करपा रोगास प्रतिकारक. ३८ ते ४० 
एच डी-२१८९ आय ए आर आय, नवी दिल्ली १९७६ १०० १२० ते १२५ बागायती, वेळेवर पेरणीसाठी, पिवळसर  चमकदार दाणा.  ३५ ते ४०
एमएसीएस-६४७८ आगरकर अ. सं., पुणे २०१४ १०० १०० ते ११० मध्यम उंची मोमदार खोड, मोमदार गडद हिरवी पाने, निम्म सरळ उभी वाढ, मध्यम मोमदार समांतर आकाराची ओंबी, चकाकणारे दाणे. ४५ ते ४८
एमएसीएस-६२२२ आगरकर अ. सं., पुणे २०१० १०० १०२ ते १०६ झाडाची उंची ८२ सें. मी., गडद हिरवी जाड पसरट पाने, निम्म सरळ उभी वाढ, मध्यम बुटकी जात, समांतर पांढरट  ओंबी, अंडाकार अंबर रंगाचे मध्यम टणक दाणे, ८२.५० टक्के गिरणी उतारा, तांबेरा रोगास प्रतिकारक. ४७ ते ५०
एच आय-१४१८ (चंदोसी) आय ए आर आय, नवी दिल्ली १९९९ १०० ११० ते १२० वेळेवर, उशिरा व अती उशिरा पेरणीसाठी उपयुक्त, तांबेरा रोगास प्रतिकारक, मध्यम टणक व चमकदार दाणा, चपातीची प्रत उत्तम ४० ते ४५
जी डब्ल्यु-४९६ एस.डी.ए.यु., विजापूर, गुजरात १९९० १०० ९६ ते ११३ पिवळसर टणक दाणा, भरपूर उत्पादन क्षमता. ४५ ते ४८
पुर्णा  गहु संशोधन केंद्र, इंदौर २००८ १०० ११५ ते १२० झाडाची उंची ८५ ते ९० सें. मी., न लोळणारी खाली वाकलेली हिरवी पाने, ‍निम्न उभी वाढ, लंब वर्तुळाकार पांढरट मध्यम आकाराची न झडणारी लोंबी, गोलाकार अंबर रंगाचे चकाकणारे मध्यम टणक दाणे, अवर्षणास जास्त प्रतिकारक. ४८ ते ५२
पोषण गहु संशोधन केंद्र, इंदौर  २००८ १०० ११५ ते १२० झाडाची उंची ८० ते ८५ सें. मी., न लोळणारी, ‍निम्न उभी वाढ, लंब वर्तुळाकार पांढरट मध्यम आकाराची न झडणारी ओंबी, गोलाकार अंबर रंगाचे चकाकणारे मध्यम टणक दाणे, अवर्षणास जास्त प्रतिकारक. ४५ ते ५०
एन आय ए डब्ल्यु-३०१ (त्र्यंबक) ए आर एस, निफाड २००२ १०० ९५ ते १०२ बागायती, वेळेवर पेरणीस योग्य वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक. ४० ते ४३
फुले समाधान म. फु. कृ. ‍वि., राहुरी २०१४ १०० ९५ ते १०२ झाडाची उंची ८० ते ८६ सें. मी., मेणासारखी मध्यम आकाराची पाने, सरळ उभी वाढ, समांतर पांढ-या रंगाच्या ओंब्या, मध्यम आकाराचे अंडाकृती टणक तपकिरी दाणे, तांबेरा रोगास प्रतिकारक. ४४ ते ४८
पीडीकेव्ही सरदार डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१६ १०० ९० ते १०० झाडाची उंची ८४ सें.मी. निम सरळ वाढ, लांब ओंबी, अंडाकृती मध्यम आकाराचे व अंबर रंगाचे टणक दाणे, कमी कालावधीत परिपक्व होणारे वाण, अधिक उत्पादन, महत्त्वाच्या रोगांना प्रतिकारक, १२.२५ टक्के प्रथिने प्रमाण, लोह व झिंकचे प्रमाण जास्त, ७६ टक्के ‍गिरणी उतारा.  ४० ते ४२
नेत्रावती म. फु. कृ. वि., राहुरी २०११ १०० १०५ ते ११५ झाडाची उंची ६१ ते ७५ सें. मी., टणक खोड, सरळ उभी वाढ, न लोळणारी, कुसळ असलेली ओंबी, दाणे झडण्यास सहनशील, अंडाकार मध्यम आकाराचे अंबर रंगाचे दाणे.

१५ ते २०

राज-४०३७ राजस्थान कृ. वि., जयपूर २००४ १०० १०४ झाडाची उंची ७४ सें. मी., न लोळणारी, मोमदार हिरवी पाने, मध्यम वाढ, मध्यम लांबट मोमदार पांढरट न झडणारी ओंबी, टणक मध्यम बारीक दाणा, तांबेरा रोगास प्रतिकारक. ३५ ते ४०
युएएस-४२८ कृषी विज्ञान केंद्र, धारवाड २०१२ १०० १०८ झाडाची उंची ८३ सें. मी., न लोळणारी, फिक्कट हिरवी मध्यम लांबट पाने, ‍निम्न उभट वाढ, कुसळ असलेली मध्यम आकाराची पांढरट न झडणारी ओंबी, लंब वर्तुळाकार मध्यम अंबर रंगाचे दाणे. ४४ ते ४७


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*